पनीरची खीर

साहित्य :

  • अडीच लिटर दूध
  • १ वाटी साखर
  • ८-१० काजू किंवा बदाम (ऐच्छिक)
  • १ चमचा चारोळ्या
  • २ चमचे बेदाणे
  • पाव चमचा केशर (ऐच्छिक)
  • ५ वेलदोडे (पूड)
  • अर्धी वाटी दही

कृती :

चार कप दूध तापवावे. उकळी आली की दही घालून फाडावे व जरा कोमट झाले की फडक्यावर बांधून त्यावर वजन ठेवावे. दोन तासांनंतर या पनीरचे लहान चौकोनी तुकडे करावे किंवा हाताने बारीक कुस्करावे. उरलेलेल दूध आटवावे. जरा दाट होऊ लागले की साखर घालून २-४ मिनिटे मंद उकळावे व खाली उतरवावे. त्यात काजूचे कप, वेलचीपूड व चारोळ्या घालाव्या. केशर चुरडून दुधात तासभर भिजत ठेवावे व नंतर घालावे. बेदाणे दूध गार झाल्यानंतर घालावे. कुस्करलेले पनीर त्यात घालून खीर अलगद मिसळावी. पुन्हा गरम करू नये.

पोळीशी खायला द्यायची असल्यास किंवा पुडिंग म्हणून जेवणानंतर देण्यास देखील छान लागते.