पशु, पक्षी आणि मासे

एकदा, पशु आणि पक्षी यांची लढाई व्हावयाची होती. त्यावेळी मासे आणि पशु यांचा असा तह झाला की, माशांनी पक्ष्यांविरूद्ध पशूंस मदत करावी. पुढे लवकरच पशुपक्ष्यांची लढाई जुंपली, पण त्या वेळी माशांनी पशूंस असा निरोप पाठविला की, ‘जमिनीवर येऊन लढाई करण्यास आम्ही समर्थ नाही.’

तात्पर्य:- ज्या माणसाचे साह्य मिळावे म्हणून त्याच्याशी आपण मैत्री करतो, त्याजकडून आपणास साह्य होणे कितपत शक्य आहे, याचा विचार पूर्वीच करावा हे चांगले, नाहीतर आयत्या वेळी त्या माणसाने हातपाय गाळले म्हणजे मग त्यासारखी फजिती दुसरी नाही.