पशु, पक्षी आणि शहामृग

पशु आणि पक्षी यांची एकदा मोठी लढाई चालली असता, पक्ष्यांनी शहामृगास कैद करून नेले. हा पशु आहे असे समजून ते त्यास शिक्षा करण्याच्या विचारात होते, इतक्यात तो शहामृग त्यास म्हणाला, ‘मित्र हो, मी पशु नाही, पक्षीच आहे. हे माझे पंख आणि ही माझी चोच पाहा.’ पक्ष्यांना ते खरे वाटले आणि त्यांनी त्यास सोडून दिले. त्याच दिवशी तो शहामृग पशूंनी पकडून नेला. हा पक्षी आहे असे समजून त्यांनी त्यास शत्रूमाणे वागविले.तेव्हा शहामृग त्यास म्हणाला, ‘मित्र हो, मी पक्षी नाही, पशुच आहे. हे माझे पाय तुमच्याच पायांसारखे नाहीत काय?’ पशूंस ते खरे वाटले व त्यांनीही त्यास सोडून दिले.

तात्पर्य:- आपण दोन्ही बाजूंकडले आहोत, असे भासविणे केव्हा केव्हा फायदेशीर असते, पण एकंदरीत ते भयंकरच होय.