पेरूची कोशिंबीर

साहित्य :

  • ३-४ मोठे दळदार पिकलेले पेरू
  • ३-४ मध्यम बटाटे
  • २-३ पातीसह कांदे
  • ३ हिरव्या मिरच्या
  • ४-५ कोथिंबीरीच्या काड्या
  • ४-५ पुदिन्याच्या काड्या
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा साखर

कृती :

पेरूची कोशिंबीर

पेरूची कोशिंबीर

बटाटे उकडून सोलावे, बटाटे, कांदे, पात, मिरच्या, कोथिंबीर व पुदिन्याची पाने बारीक चिरावी.

पेरूच्या बियांचा भाग टाकून द्यावा. साल काढून टाकून गर बारीक चिराव्या.

सर्व एकत्र अलगद मिसळावे. मीठ व साखर घालावी. लिंबाचा रस पिळावा व गार करून ही कोशिंबीर खायला द्यावी.

उपासासाठी करायची असल्यास पुदिना व कांदे वगळावे. त्याऐवजी अर्धा चमचा जिरेपूड घालावी.