फणसाच्या गऱ्यांची भाजी

साहित्य :

 • फणसाचे गरे
 • अर्धी वाटी नारळ
 • १० आठळ्या
 • ४ सुक्या मिरच्या
 • हिंग
 • लाल तिखट
 • हळद
 • मोहरी
 • तेल
 • गूळ
 • मीठ

कृती :

प्रथम फणसाचे गरे सोलावेत. आठळ्या चिरून सोलाव्यात. गरे आधण आलेल्या पाण्यात किंवा कुकरमध्ये २ किंवा ३ शिट्या काढून शिजवावेत. (पाणी न घालता) शिजवल्यानंतर त्यात गूळ (आवडीप्रमाणे) लाल तिखट, मीठ घालावे व पुन्हा शिजवावे पूर्ण शिजल्यावर एका ताटात काढून घ्यावे. नंतर त्यावर नारळ घालावा. थोड्या जास्त तेलात ५-६ सुक्या मिरच्या तळून घ्याव्यात. तळलेल्या मिरच्या कुस्कराव्यात व भाजीवर घालाव्यात. उरलेल्या तेलात मोहरी, हिंग, लल तिखट, हळद घालून फोडणी करावी व ती भाजीवर ही भाजी अतिशय रुचकर लागते.