अननस केक

साहित्य:

  • १/२ डबा कंडेस मिल्क
  • २ कप मैदा
  • १ कप लोणी
  • १ लहान चमचा बेकिंग पावडर
  • १/२ चमचा खायचा सोडा
  • १ कप गरम पाणी
  • एक चमचा अननस एसेंस
  • २०० ग्रॅम ताजे क्रिम
  • ४ चमचे पीठी साखर
  • अननसचे तुकडे

कृती:

अननस केक

अननस केक

मैदा गाळून सोडा व बेकिंग पावडर मिसळा. एक भांड्यात लोणी व कंडेस मिल्क टाकून लाकडी चमच्याने फेटा. यात मैदा मिसळा व पाणी आणि एसेंस टाका. केक पॉट मध्ये तूप लावून मिश्रण त्यात टाका. ओव्हन ३५० डिग्री फेरनहाइट वर बेक करा. ओव्हन पंधरा मिनीटांपूर्वी गरम करा. क्रीम मध्ये पिठी साखर मिसळा. केक थंड झाल्यावर त्याला आढावा कापा केक नरम होण्यासाठी त्यात थोडे साखर-सिरप टाकू शकता. थोडीशी क्रीम केकच्या एका भागावर लावा. दुसरा भाग त्यावर ठेवा. आता वर पण क्रीम लावा व अननसाचे तुकडे लावा. क्रीम मध्ये खाण्याचा रंग टाकुन त्याने केकला सजवा.