पिस्ता सरबत

साहित्य :

  • १०० ग्रॅम हिरवे पिस्ते
  • १२ वेलदोडे
  • १० चमचे साखर
  • ५ ग्लास थंड पाणी
  • ५-६ चमचे थंड मलाई
  • चिमुटभर केशर
  • १ छोटा चमचा पिस्त्याचे तुकडे

कृती :

पिस्ते व वेलदोडे ४ तास पाण्यात ठेवावे. पिस्ते सोलून घ्यावेत. सोललेले पिस्ते व भिजवलेल्या वेलच्या आणि १ ग्लास पाणी मिक्सरमधून काढून चाळणीमध्ये किंवा कपड्याने गाळून घ्यावे. उरलेला चोथा पुन्हा मिक्सरमधून काढून गाळून घ्यावा. नंतर पिस्ता-वेलचीचे मिश्रण, भिजवलेले केशर,चवीपुरती साखर आणि पाणी एकत्र करून मिक्सरमधून काढावे. काचेच्या ग्लासात बर्फाचा चुरा घालूण वरून पिस्ताचे पेय भरावे. सरबत देताना त्यावर थंड मलई किंवा क्रीम घालावे. वरून पिस्त्या कापाने हे सरबत सजवावे.