कवी दत्ता हलसगीकर यांचे निधन

दत्ता हलसगीकर

दत्ता हलसगीकर

ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक दत्ता हलसगीकर यांचे अर्धांगवायूच्या आजारने शनिवारी सोलापूरात निधन झाले. त्यांनी आपल्या आशयघन कवीतांच्या माध्यमांतून सामाजिक परिस्थितीची बांधणी केली होती. ‘मराठी कवितेतील अखंड दरवळणारे पारिजातकाचे झाड कोमेजले,’ साहित्यविश्वात अशी दुःख भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुविधा, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे, असा परिवार आहे. विजापूर रोड येथील निवासस्थानी हलसगीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मोदी स्मशानभूमीत रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

७ ऑगस्ट १९३४ रोजी दत्ता हलसगीकर यांचा जन्म सोलापूर येथे झाला. हलसगीकर यांनी सोलापूरातील प्रसिद्ध लक्षमी विष्णू मिलमध्ये ३० वर्षे नोकरी केली व वयाच्या साठाव्या वर्षी निवृत झाले. त्यानंतर त्यांनी साहित्यनिर्मितीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले.

अव्याहतपणे गेली पाच वर्षे त्यांची साहित्यनिर्मिती सुरु असून, काव्य लेखन आणि स्फूट लेखन हे त्यांचे आवडते विषय होते.