अध्यक्षपदासाठी मंगेश पाडगावकरांचे नाव चर्चेत

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर

साहित्य महामंडळाने चिपळून येथे होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी जारी केल्यानंतर नामवंत साहित्यिकांची नावे बुधवारपासून चर्चिली जात आहेत.

मंगेश पाडगावकर यांच्यासारखा ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदी असावा व निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काहींचे प्रयत्न सुरु आहेत. पण पाडगावकर या अध्यक्षपदासाठी इच्छूक नसल्याचे समजले जात आहे.

नागनाथ कोतापल्ले, ह. मो. मराठे, अनंत दीक्षित आदी साहित्यिकांची नावेही चर्चेत आहेत.