आधी स्वतःचे चारित्र्य निरखून पहा

प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे

प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर आरोप केला की, ‘राज ठाकरे यांचा इंदू मिलच्या वक्तव्यावरुन बाबा आंबेडकरांविषयीचा कडवा द्वेष प्रकट झाला आहे.’ ‘राज ठाकरे यांनी स्वतःचे चारित्र्य आधी निरखून पहावे नाहीतर त्यांची पोलखोल करायला फारसा वेळ लागणार नाही,’ असा इशाराही त्यांनी बुधवारी केला.

‘मनसेने काढलेल्या मोर्चात राज यांचा बौद्ध व मुस्लिम यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशातल्या तीन शहरांत कुठेही बुद्ध मूर्तीची विटंबना झाल्याची माहिती आमच्याकडे नाही. त्यामुळे कशाच्या आधारावर राज यांनी माहिती दिली,’ अशा आरोपाबरोबर आंबेडकर यांनी सवालही केला आहे.