मुख्यमंत्री यांचा नितीशकुमारांना सणसणीत टोला

पृथ्वीराज चव्हाण आणि नितीशकुमार

पृथ्वीराज चव्हाण आणि नितीशकुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वक्तव्य केले होते की, ‘मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना बिहारी लोकांविरोधात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाठिंबा देत आहे का’. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सणसणीत टोला लगावला की, ‘टीका करताना नितीशकुमार सर्वात खालच्या पातळीवर पोहोचल्याचे समजते’.

अब्दुल कादीर याने आझाद मैदान येथील अमर जवान स्मारक तोडले होते व मुंबई पोलिसांनी त्याला बिहार मध्ये जाऊन अटक केली होती. पण बिहारच्या मुख्य सचिवांनी ‘बिहार सरकारची परवानगी न घेता अटक कशी करु शकता’ असे प्रश्न विचारत मुंबई पोलिसांना पत्र पाठविले. त्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बिहारी लोकांना महाराष्ट्रातून हाकलवून देण्याचे वक्तव्य केले होते. ‘राज यांना अटक करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार त्यांना मोकळे सोडून देत आहे. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व स्वीकारल्यासारखे राज ठाकरे वागत आहेत’, अशी टीका नितीशकुमार यांनी त्यावेळेस केली.

यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘दोन राज्ये एकजूट असावीत. पण असे राजकारणी वक्तव्य करुन नितीशकुमार खालच्या स्तरावर पोहोचले आहेत. मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन कादीरला अटक केली. यात मुंबई पोलिसांची काहीच चूक नाही. वेळ साधून नितीशकुमार यांना प्रतिउत्तर दिले जाईल’.