पाणीकपातीची शक्यता

पाणीकपातीची शक्यता

पाणीकपातीची शक्यता

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले की, पावसाने आणखी विश्रांती घेतल्यास, एक दिवसाआड पाणीकपात करावी लागणार आहे. त्याचे नियोजनही तयार आहे.

खडकवासला धरणामध्ये पुण्याला अजून दीड महिना पाणी पुरण्याइतका साठा आहे. पावसाने आणखी लांबण लावल्यास पाणीकपात करण्याची गरज पडणार आहे. पाणीकपातीचा निर्णय १५ जुलैपर्यंत घेतला जाणार नाही. त्यानंतर पाटबंधारे खात्याबरोबर बैठक होईल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.