शौर्याचे शौर्य पाहून लक्ष्मण थक्क

आर. के. लक्ष्मण

आर. के. लक्ष्मण

मंगळवारी शौर्य महानोत या बाल-चित्रकाराचा कौतुक समारंभ प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निवासस्थानी झाला. ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट’ चित्र रंगवून शौर्याने लक्ष्मण यांना आश्चर्यचकित केले. शौर्याचे कौतुक करण्यासाठी लक्ष्मण यांनी त्याच्या ‘पेंटिंग’वर स्वाक्षरही केली. पण लक्ष्मण यांना स्वाक्षरीने समाधान वाटले नाही. त्यांनी शौर्याला एक ब्रशही भेट दिला. शौर्य हा मध्यप्रदेश मधील आदित्यसिंग आणि पुष्पा महानोत यांचा सुपुत्र आहे व आजवर त्याने एकशेवीस चित्रे काढली आहेत. लक्ष्मण यांच्यासह त्यांच्या पत्नी कमला व त्यांची कन्या उषा यादेखील शौर्याचे कौतुक करण्यासाठी हजर होत्या.