राज्यात पुणे सोडून वरुणराजाचे अस्तित्व

वरुणराजाची हजेरी

वरुणराजाची हजेरी

अरबी समुद्र व राजस्थान पासून उत्तर-पश्चिम बंगालपर्यंतच्या पट्ट्यात द्रोणीय अवस्था निर्माण झाली व त्यामुळे राज्यातील विविध भागांत २४ तासांत चांगला पाऊस पडला आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे की, ही स्थिती पुढच्या २४ ते ४८ तास राहणार आहे व त्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत धो-धो पाऊस पडला. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे बऱ्याच ठिकाणी येत्या २४ तासांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने इशारा दिला आहे की कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते.

पुण्यातला बऱ्याच ठिकाणी आज ढगाळ वातावरण दिसले पण थोड्याच ठिकाणी पावसाने आपले अस्तित्व दाखवले. पुणेकरांना भूरभूर पावसाचा आनंद मिळाला. पुण्यात रविवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत ०.७ मिमी पावसाची नोंद झाली.

काल शहरातल्या काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी ८.३० वाजता ०.३ मिमी पावसाची नोंद झाली.