राज ठाकरे यांचे एक पाऊल पुढे

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात त्यांच्या पाठीशी राहिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज यांनी त्यांना पुष्पगुच्छ पाठविले. उद्धव यांचे अभिष्टचिंतन राज यांनी सहा वर्षांनंतर प्रथमच केले आहे. त्यामुळे ‘या दोघा भावांमधील नाते फुलणार की नुसतेच झुलणार’ अशी चर्चा आता सुरु आहे.

राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर दोघा भावांमधील बंधुत्वाचे नाते नाहीसे झाले होते. पण उद्धव यांच्या आजारपणामुळे दोघेही भाऊ जवळ आले व त्यांच्या नात्यात गोडी निर्माण झाली. राज यांनी उद्धव यांना पुष्पगुच्छ पाठवून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. उद्धव यांना हा पुष्पगुच्छ शिवसेनेचे प्रसिद्धीप्रमुख सचिन मोरे यांनी दिला. त्यामुळे समेटाच्या चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे.

1 thought on “राज ठाकरे यांचे एक पाऊल पुढे

Comments are closed.