गोनीदा यांच्या दुर्गचित्रचे प्रकाशन

गोपाल नीलकंठ दांडेकर

गोपाल नीलकंठ दांडेकर

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी आवाहन केले की, ‘गड-किल्ले, संस्कृती, इतिहासांच्या पानांचे, चरित्रांचे होणारे विकृतिकरण आता थांबवा.’ प्राण्यांच्या विविध जाती नष्ट होत असल्याचा उल्लेख त्यांनी त्या वेळी केला आणि गडांची दुरावस्था रोखण्याचा त्यांनी सल्ला दिली.

गो. नी. दांडेकर यांनी काढलेल्या किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या म्हणजेच ‘गोनिदांची दुर्गचित्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. वीणा देव यांनी हे पुस्तक संकलित संपादित केले आहे आणि मृण्मयी प्रकाशनने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. त्यावेळी राज ठाकरे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अरुन टिकेकर त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे म्हणत होते की, ‘सजीव गोष्टींचे चित्रण करणे अवघड नाही परंतु स्थिर वस्तूंना बोलते करणे कौशल्याचे काम आहे आणि हे गोनीदांनी त्यांच्या पुस्तकातून केले आहे. ही छायाचित्रे पाहून त्यांच्या मनातील भावना ही दिसून येतात. पण एवढ्या सुंदर गडांची दुरावस्था पाहून आंतून मनाला खूप अस्वस्थ वाटते. या वास्तूंना जपणे खूप गरजेचे आहे. युरोपमध्ये किल्ल्यांवर संग्रहालये विकसीत करण्यात आली आहेत. मात्र, आपल्याकडे किल्ल्यांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे व्यक्ती, चरित्रे, इतिहासाच्या पानांसह गड-किल्ल्यांचीही विकृती करणे आपला स्वभाव बनत चालला आहे आणि आता ते थांबवायला हवे.’

मुलांनी मराठी भाषेकडे दुर्लक्ष करण्याचे कारण म्हणजे, मराठी शाळांमध्ये चांगले मराठी न शिकवणे. शालेय जीवनात मराठी भाषा चांगली शिकवली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुस्तकाचे रसग्रहण टिकेकर यांनी केले. डॉ. वीणा देव यांनी पुस्तकामधील भूमिका मांडली. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. विजय देव यांनी प्रास्ताविक केले.