भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी योगगुरु रामदेवबाबा यांच्या चरणांना स्पर्श करुन नमस्कार केला.
भाजप हा देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. रामदेवबाबा काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईत पाठिंबा मागण्यासाठी गडकरी यांना भेटायला गेले होते. यावेळी गडकरी यांनी वाकून केलेला नमस्कार चर्चेचा विषय ठरला आहे.
भाजपमध्ये पक्षाचा अध्यक्ष सर्वश्रेठ व सर्वोच्च स्थानी असतो. रामदेवबाबांच्या पायाशी भाजपचे अध्यक्ष झुकल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईत भाजप रामदेवबाबांना साथ देईल, असे वचनही गडकरी यांनी दिले.
या भेटीला राजकीय रंग देऊ नये. या लढाईचा पाठींबा मागण्यासाठी आम्ही सर्वच पक्षनेत्यांची भेट घेणार आहोत, असे रामदेवबाबांनी सांगितले.