रसगुल्ला

साहित्य:

  • १ लिटर गाईचे दूध
  • १ मोठा चमचा सफेद विनेगर
  • सव्वा किलो साखर
  • २ छोटे चमचे मैदा
  • काही थेंब गुलाब पाणी

कृतीः

रसगुल्ला

रसगुल्ला

गायीच्या दुधास उकळवावे, गॅस वरून काढुन सफेद विनेगर टाकुन त्यास फाडावे आणि लगेच एका कपड्यात ठेवावे आणि त्यात थंड पाणी टाकावे.

चांगल्या तर्‍हेने अतिरिक्त पाणी काढुन टाकावे. नंतर यास चांगल्या तर्‍हेने मिळवावे. मैदा मिळवून छोटी छोटी गोळी बनवावे. आणि वेगळी ठेवावी.

तीन चतुर्थांश लिटर पाण्यात साखर मिळवावी उकळवून पातळ पाक बनवावा. गोळ्या हळुच त्यात टाकुन १ मिनीट पर्यंत उकळवावे दोन मोठे चमचे पाणी टाकावे रसगुल्ले तरंगेपर्यंत शिजवावे.

रसगुल्ले काढुन गुलाब जल मिळवून थंड करावे, नंतर वाढावे.