रवा इडली

साहित्य:

  • १/२ किलो रवा
  • १ लहान चमचा मीठ
  • १/२ लहान चमचा मोहरी
  • १०-१२ कढीपत्त्याची पाने
  • ३०० ग्रॅम आंबट दही
  • १ लहान चमचा खाण्याचा सोडा
  • तेल

कृती:

रवा इडली

रवा इडली

एका कढईत तेल गरम करून त्याच्यात मोहरी व चिरून कढीपत्ता व रवा टाका. थोडासा भाजून गॅस बंद करा.

गार झाल्यावर एका भांड्यात रवा दहीत भिजवा. मीठ टाकून १ तास झाकून ठेवा. मिश्रण जास्त पातळ असू नये. इडली पात्रांना तेल लावून ठेवा.

एका वाटीत तेल गरम करून त्याचे १ लहान चमचा खाण्याचा सोडा टाका व गरम करा. हे रव्याच्या मिश्रणात टाकून लवकर-लवकर हलवा म्हणजे मिश्रण फुलून जाईल.

आता हे मिश्रण पात्रांमध्ये टाका. प्रेशर कुकरमध्ये १ ग्लास पाणी टाकुन उकळी घ्या. इडली पात्र याच्यात ठेवा झाकण शिटी लावल्याशिवाय बंद करा व झाकण १० मिनीटांनी उघडा.

इडली खोबर्‍याच्या चटणी व सांबर बरोबर वाढा.