रव्याचे चुरम्याचे लाडू

साहित्य :

  • ५०० ग्रॅम बारीक रवा
  • १२५ ग्रॅम खवा
  • ३५० ग्रॅम पिठीसाखर
  • २५ ग्रॅम बेदाणा
  • ७-८ वेलदोड्यांची पूड
  • अर्धी जायफळाची पूड
  • ७-८ बदामाचे काप
  • ३ टे. चमचा डालडाचे मोहन.

कृती : रव्यात तुपाचे मोहन घालून घट्ट भिजवा. नंतर मुटके करून मंदाग्निवर तळा. नंतर लगेचच कुटून घ्या. नंतर सर्व एकत्र करून लाडू वळा.