हृदयी जागा, तूं अनुरागा

हृदयी जागा, तूं अनुरागा
प्रीतीला या देशिल का ? ॥धृ॥
बांधिन येथें घरकुल चिमणें
स्वर्गांचे तें रूप ठेंगणें
शृंगाराचें कोरिव लेणें,
रहावयाला येशिल का ?॥१॥

दोन मनांची उघडीं दारें
आंत खेळतें वसंत-वारें
दीप लोचनीं सदैव तूं रे,
संध्यातारक होशील का ? ॥२॥

घराभोवतीं निर्झर नाचे
जाणुन अपुल;या गूढ मनाचें
झांकुन डोळे एकांताचे
जवळीं मजला घेशिल का ? ॥३॥