साबुदाणा पापडी

साहित्य :

  • साबुदाणा निवडून अर्धी वाटी
  • मीठ चवीपुरते
  • पाणी दोन वाटी

कृती :

साबुदाणा धुऊन चार/पाच तास भिजवून ठेवावा. पाण्यात मीठ टाकून उकळायला ठेवावे. पाणी उकळू लागले की आच मंद करावी. पाण्यात हळूहळू साबुदाणा टाकत हालवत राहावे. साबुदाणा शिजून पारदर्शक झाल्यावर व थोडे गार झाल्यावर प्लॅस्टिकच्या कागदावर ठराविक आकाराच्या पापड्या घालाव्या. दोन/तीन दिवस चांगले ऊन द्यावे. कडकडीत वाळवाव्यात. स्वच्छ कोरड्या डब्यात भरून ठेवाव्या. गरज भासेल तेव्हा तळून खाव्यात.