साबुदाण्याची लापशी

साहित्य :

  • साबुदाणा अर्धा कप
  • दूध एक कप
  • साखर दोन चमचे

कृती :

साबुदाणा पाण्यात धुऊन थोडा वेळ तसाच ठेवा. नंतर हा साबुदाणा अर्धा कप पाण्यात शिजवावा. जरूर पडल्यास थोडे पाणी घातले तरी चालते. मग दूध घालून आणखी थोडा वेळ शिजवावे. मग भांडे खाली उतरवा. साखर घाला व ढवळून घ्या. गार/गरम आवडीप्रमाणे खा.