मास्टर ब्लास्टर सचिनचा शपथविधी ४ जूनला होणार

सचिन तेंडुलकर राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहे

४ जून रोजी सचिन तेंडुलकर राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी बुधवारी माहिती दिली की, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या दालनात हा शपथविधी होणार आहे. १६ मे रोजी राज्यसभा निवडण्यात आलेल्या अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आगा यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. सचिन त्यावेळेस ‘आयपीएल’ मध्ये व्यग्र असल्या कारणाने तेथे उपस्थित राहू शकला नाही.