सजीव सृष्टी

हाच ममत्वाचा भाव पशुपक्षी, कीटक, वनस्पती यांबाबतही उत्पन्न होतो. त्यांचे पोषण, त्यांचे रक्षण, त्यांच्याबद्दल ममत्वभाव य गोष्टी सहजरीत्या घडत राहतात. पूर्वी घराच्या उंच भिंतींना पक्ष्यांच्या निवासासाठी विटांमध्ये पोकळ जागा आवर्जून ठेवली जायची. आजही मोठमोठ्या शहरांतून कबुतरे व पक्षी यांना धान्य घालण्यासाठी रस्त्यांच्या कडेला सोय केलिली असते. जवळच पाणीही ठेवलेले असते. शेजारीच चणेदाण्याची दुकानेही असतात. गायीला चारा घालणे हा प्रकार त्यातलाच. गायींच मालकच गवत घेऊन बसतो. त्यातील चारा विकत घ्यायचा व गायीला घालायचा. मोठ्या माणसाबरोबरच छोटी मुलेही यात आनंदाने सहभागी होतात. मग हरणांची शिकार करणारा सिनेनट, केवळ मजेखातर पक्ष्यांवर बंदूक चालवणारे कूरकर्मा, उगाचच कुत्र्यांना दगड मारणारी मुले, अशासारख्यांबद्दल समजामनात कुठेतरी एक सल खोलवर रुजलेला राहतो. त्याच्या मुळाशी संस्कारक्षम कौंटुबिक जीवनच असते.

जिर्जीव वस्तूंबाबतच्या आपल्या दृष्टीकोनासंबंधी तर एका विदेशी माणसानेच आपल्याला प्रशस्तिपत्र दिलेले आहे. चंदीगढ शहराच्या निर्मितीत भाग घेणाऱ्या वास्तूशास्त्रज्ञाने म्हटले, “ काय अजब आहांत तुम्ही हिंदू लोक ! दगडामातीचीही पूजा करता ! तुमची संस्कृती खरोखरच अद्भुत आहे ! ”