समुद्र किनाऱ्यावरील प्रवासी

काही लोक समुद्र किनाऱ्याजवळून प्रवास करीत असता, दूरवर समुद्रात एक मोठी काळ्या रंगाची वस्तू वाहात येताना त्यांना दिसली. ते पाहून त्या लोकांना एखादे गलबत असावे असे वाटले काही वेळाने तो पदार्थ जास्त जवळ आल्यावर ते गलबत नसून एक लहानशी होडी असावी असे त्यांस वाटले. शेवटी तो पदार्थ अगदी किनाऱ्याजवळ आल्यावर ते पाहतात तो, ते एक जातीचे काळ्या रंगाचे गवत आहे असे त्यांस आढळून आले.

तात्पर्य:- दूरच्या वस्तूची किंवा मनुष्यांची नुसती नांवे वाचून त्यांच्यासंबंधाने जो आपला ग्रह होतो, तो, त्या वस्तु किंवा ते लोक प्रत्यक्ष पाहिल्यावर पुष्कळ वेळां बदलतो.