सांडगे

साहित्य :

  • अर्धा किलो चणा डाळ
  • १ वाटी मटकीची डाळ
  • १ वाटी उडीद डाळ
  • १ वाटी मूग डाळ
  • २-३ चमचे लाल तिखट
  • हळद
  • २ चमचे हिंग
  • अंदाजे ३ चमचे मीठ
  • ४ चमचे जिरे

कृती :

सर्व डाळी २ तास भिजत घालाव्यात. मग त्यात जिरे घालून वाटाव्यात. नंतर त्यात वरील सर्व साहित्य घालून छोटे छोटे सांडगे प्लॅस्टिकच्या कागदावर घालावेत व चांगले वाळेपर्यंत उन्हात ठेवावेत.

टीप : सांडगे तळून खाता येतात तसेच त्याची आमटी करता येते. एखाद्या रसभाजीतही तळून घालता येतात.