सांजवेळी

सांजवेळी पाखरांचे दूर जाणे हा कोणता खेळ आहे.
सांजवेळी कंकणाचे चूर होणे हा कोणता खेळ आहे.
वाहती पाण्यावरून सदा या साऱ्या मंद लहरी
सांजवेळी मासळ्यांचे सूर मारणे हा कोणता खेळ आहे.
काठ दोन्ही भरून गेले बेताल झाली झाडेच अशी
सांजवेळी नदीला पूर जाणे हा कोणता खेळ आहे.
कोण आहे शिल्पकार हा जीवनाचे चित्र रेखिले
सांजवेळी चुळीचे धूर जाणे हा कोणता खेळ आहे.
झाड गेले झाखाळूनि दाटला अंधार दिशात
सांजवेळी डोंगरांचा नूर जाणे हा कोणता खेळ आहे.
निघाल्या कळपात गायी शिस्त त्यांची वेगळी
सांगवेळी वासरांचे चौखूर होणे हा कोणता खेळ आहे.

This entry was posted in मराठी कविता and tagged , , , , , , , , , , on by .

About संतोष सेलुकर

सध्या प्रार्थमिक शिक्षक. चार वर्ष सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमात विषयतज्ञ म्हणून कार्य. कविता संग्रह "दुरचे गाव" प्रकाशित झाला असुन अनेक वृत्तपत्रे मासिके यामधून कविता व ललित लेख प्रसिद्ध. १] राज्यस्तरीय कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक. २] अखिल भारतिय साहित्य संमेलन नाशिक येथे कविता वाचन - विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली. ३] जागल प्रतोष्ठाण पेठशिवणी, तेजोमयी प्रतिष्ठाण परभणी, चक्रधर स्वामी वाचनालय पालम यांच्या विविध कार्यक्रमांचे(वाड़मयीन) आयोजन व सहभाग. ४] विविध शैक्षणिक प्रशिक्षणातून तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.

One thought on “सांजवेळी

Comments are closed.