संकरित पैदास कशासाठी

  1. संकरित गायी देशी गायीपेक्षा तिप्पट ते चौप्पट जास्त दूध देतात.
  2. संकरित कालवड लवकर वयात येते. देशी कालवडी वयात येण्यासनिदान ३-४ वर्षे लागतात तर संकरित कालवड एक ते दीड वर्षाचे आत वयात येवून फळतेही. म्हणजेच दूध मिळण्यासाठी संकरित गायीस कमी काळ पोसावे लागते व अशा रितीने पोषणाच्या खर्चात एकदम अर्ध्यापेक्षा जास्त बचत होते.
  3. साधारणपणे वयाच्या अडीचव्या वर्षी संकरित गायीस वासरू होते. देशी गायीचे २ वेतामधील अंतर फार जास्त (४६६ दिवस) असते. गायी जन्मल्यानंतर जास्तीत जास्त ३०० दिवसपर्यंत दूध देतात म्हणजे संकरित गायीस आटलेल्या स्थितीत (भाकड काळ) फार थोडे दिवस (२-४ महिनेच) पाळावे लागेल. तर देशी गायीच भाकड काळ फार जास्त म्हणजे ८-१० महिने तरी असतो.
  4. खाद्याचे रूपांतर दूधात करण्याची क्षमता संकरित गायीत देशी गायीपेक्षा जास्त असते.
  5. देशी गायीपासून एक लिटर दूध उत्पादनाचा खर्च १रू.२०पैसे असेल तर तोच खर्च संकरित गायीच्या बाबतीत मात्र फक्त ७५ पैसे पडतो.
  6. संकरित गायी गरिब असून मारक्या वगैरे नसतात. त्यांच्या गळ्यात लोढणे सहसा लागत नाहीत म्हणूनच संकरित गायी सांभाळणे देशी गायीचा कळप हाताळण्यापेक्षा केव्हाही सोपे असते.
  7. संकरित गायीपासून मिळणारे गोऱ्हे देखील शेतीच्या कामात गायी इतकेच उपयुक्त असतात.