सरळ हिशेब

एकदा अकबर बादशहान बिरबलाला विचारलं, ‘बिरबल ! तु नेहमी तुझ्या बायकोला बघत असतोस. तर मग तिचे दोन्ही हातात एकूण किती?

बांगड्या आहेत, ते मला नेमकं सागं पाहू ?’

बिरबल म्हणाला, ‘ खाविंद, आपण दिवसातून शेकडो वेळा आपल्या दाढीवरुन हात फ़िरवीत असता, त्यामुळे आपल्या दाढीत एकूण नक्की किती केस आहेत, हे आपल्याला ठावूक आहेच. तेव्हा त्या केसांच्या एकूण संख्येच्या एक हजारांश हिश्श्यानं माझ्या बायकोच्या दोन्ही हातात मिळून बांगडया आहेत.’
बिरबल म्हणाला, उत्तरानं बादशहा एकदम गप्प बसला.