ससे, कोल्हे आणि गरुड

एकदा ससे आणि गरुड यांची मोठी भयंकर लढाई चालू होती. तेव्हा गरुडांचा पाडाव करण्याच्या कामी कोल्ह्यांची मदत घेण्याचा सशांनी विचार केला, व त्याप्रमाणे त्यांनी त्यास विनंती केली. सशांचे बळ किती आहे व त्यांचे शत्रु जे गरुड त्यांची शक्ति केवढी आहे, हे ठाऊक नसताही, ते मूर्ख कोल्हे सशांस मदत करण्यास एकदम कबूल झाले.

तात्पर्य:- भांडणाऱ्या दोन पक्ष्यांचे बलाबल काय आहे याची चौकशी केल्याशिवाय त्यांच्या भांडणात आपण पडणे, हा मूर्खपणा होय.