सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१२

सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१२

सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१२

दि. ३ व ४ नोव्हेंबर २०१२ रोजी सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल – २०१२
शाहूकला मंदिर सातारा येथे……!!

नैतिक क्रिएटर्स या संस्थेतर्फे आयोजित साताऱ्यामध्ये प्रथमच ३ व ४ नोव्हेंबर रोजी शाहूकला मंदिर येथे होत असलेल्या सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल च्या प्राथमिक फेरीचा निकाल ७ ऑक्टोबर २०१२ रोजी जाहीर करण्यात आला. सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल साठी पहिल्याच वर्षी राज्यभरातून प्रचंड विक्रम प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरातील फिल्म मेकर्स आणि रसिकांनी या साताऱ्याच्या नैतिक क्रिएटर्स ला प्रेमाची आणि प्रतिसादाची उत्स्फूर्त दाद दिली आहे. काल्पनिक लघुपट व माहितीपट साताऱ्यामध्ये प्रथमच या फेस्टिवल मध्ये पाहण्यास मिळतील…!!

प्राथमिक फेरीचे परिक्षक म्हणून महाराष्ट्र टाईम्स चे निवासी संपादक, सुप्रसिध्द “दोन फुल एक हाफ” आणि साहित्याचे लेखक, Asian Film Foundation चे Community Member आणि खजिनदार श्री. श्रीकांत बोजेवार, सुप्रसिध्द मराठी चित्रपठ “बोक्या सातबंडे”, बॉम्बे टू गोवा चे दिग्दर्शक श्री. राज पेंडूरकर व आपल्या “रोड टू संगम” या हिंदी चित्रपटासाठी १९ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक, दिग्दर्शक श्री.अमित राय यांनी काम पाहिले. या तिन्ही परीक्षकांनी न्यायपूर्वक निवड प्रक्रिया पार पाडली. या फेस्टिवलमध्ये निवडण्यात आलेल्या फिल्मसची नावे, माहिती व Passes ची माहिती www.ssff.in या संकेतस्थळावर व ९८८१९०४६९०/९८२२०५४२५१ उपलब्ध होणार आहेत.

या फेस्टिवल च्या माध्यमातून सर्व नव्या जुन्या फिल्म मेकर्स, कलाकारांना साताऱ्यामध्ये एकत्र येता येणार आहे आणि स्वत:चे कौशल्य दाखविता येणार आहे. नैतिक क्रिटर्स च्या पुढाकाराने साताऱ्यामध्ये प्रथमच होत असलेल्या या फेस्टिवल ला प्रचंड प्रतिसाद देवून फिल्म मेकर्सनी जणू सातारी चित्रसंस्कृतीला सलामच केला आहे..! हा फेस्टिवल कशा स्वरुपाचा असेल याबाबत सर्वांची उत्सुक्ता आहे. दि. ३ व ४ नोव्हेंबर ला होणाऱ्या या फेस्टिवल साठी नामांकित कलाकार, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत. नैतिक क्रिएटर्स सातारा यांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये लघुपटाचे वारे वाहण्यास विक्रमी सुरुवात झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही…!

Fast Food, Fast Calling, Fast Trains हि काळाची गरज आहे तर मग भविष्यात Fast Films – Short Films ही देखील काळाची गरज का नाही होणार? “सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल” च्या माध्य्मातून भविष्यातील गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय…!!

या फेस्टिवल्साठी राज्य बाहेरुन देखील entries साठी विचारणा झाली. विशेषत: कलकत्ता, दिल्ली व लंडन वरून देखील या फेस्टीवल मध्ये सहभागी होण्याकरिता विचारणा झाली. या मध्ये social networking चा महत्वाचा वाटा ठरला आहे…! या फेस्टिवल साठी

 • सातारा – २४
 • मुंबई – २९
 • पुणे – ५०
 • सोलापूर – ३८
 • कोल्हापूर – १६
 • रत्नागिरी – ६
 • औरंगाबाद – ९
 • सांगली – ८
 • अहमदनगर – ३
 • लातूर – ३
 • नागपूर – २
 • उस्मानाबाद – १
 • धुळे – १
 • नळदुर्ग – १

अशा १९१ फिल्म्स मधून अनुक्रमे

 • सातारा – ३
 • मुंबई – ८
 • पुणे – १६
 • सोलापूर – ७
 • कोल्हापूर – ४
 • औरंगाबाद – ३
 • सांगली – १
 • अहमदनगर-२
 • लातूर – १

अशा ४५ फिल्म्स निवडल्या गेल्या. या सर्व फिल्म्स च्या माध्यमातून विविध विषय हाताळण्यात आलेले आहेत..SSFF मध्ये १२ ते ७० या वयोगटातील सर्वच फिल्म मेकर्स सहभागी झाले होते.मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी व संकृत भाषेमधील चित्रपट या फेस्टिवल साठी सहभागी झाले आहेत. या फेस्टिवल च्या माध्यमातून प्रथमच मोबाईल वर फिल्म्स शूट करण्याची संकल्पना पुढे आली. दोन दिवसाचे हे फेस्टिवल सामान्य प्रेक्षकांना देखील पाहता येणार आहे.

करीता www.ssff.in व ९८८१९०४६९०/९८२२०५४२५१ या क्रमांकावर संपर्क करावा.

सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये सातारा मधून

 • खिडकी : महेश कुलकर्णी
 • शिवकांता : कैलास जाधव
 • माया शुज : अमित देशमुख
 • पुण्याहून २:३० AM : समीर सुमंत
 • एक पाऊस हरवलेला आणि बाकी शुन्य : अश्विनी अभ्यंकर-घैसास
 • लिपस्टिक आणि ३० p/m : चेतन थोरात
 • धुकं : स्वानंद बर्वे
 • सुसंगत :सुशील जाधव
 • आय कॅन :मयुर हंडे
 • इच्छा अपुर्ण : सुरेश सायकर
 • रक्त आणि माती : संजोग देसाई
 • लूप्स : पियुष शाह
 • बक्षीस : अभय चौगुले
 • वेठबिगार एक समस्या : फैयाज इनामदार आणि योगेश शर्मा
 • एका जंगलीयाने : वृषाली गंभीर
 • First Expression Of Mankind : रश्मी देव
 • मुंबई मधून टी-टाईम : राजदत्त रेवणकर
 • The Passion Of Cricket : श्याम साळूंखे
 • Recycle : सचिन केदार
 • थेंबे थेंबे तळे साचे : विशाल कुंभार
 • Flying Melody : मंगेश त्रिभुवन
 • For A Moment : तुषार गवारे
 • छाता : प्रमोद कांबळे
 • लिंबू : अभिषेक करंगुटकर
 • गाभा : अमित वाघचौरे
 • सोलापूरहून अधिक उणे : उमाकांत चौंडे
 • पाटी : तुषार मोरे आणि थॉमस रोमना
 • देवाघरचे देणे : रुद्रेश व्हद्लुरे
 • कवितेला वाटले आपण चित्र व्हावे : आमोल चाफलकर
 • Lonsom Dove : झीशान नदाफ
 • Alone At Home : प्रसाद वरवंतकर
 • नौइज : संदीप डोंगरे
 • कोल्हापूर हून पायतान : कौस्तुभ बंकापूरे
 • मनात तू : विद्यासागर अध्यापक
 • Inspiration Of Kolhapur : प्रसाद मह्येकर
 • ब्लांक नेस्ट : अमर कांबळे
 • औरंगाबाद हून पुरणपोळी : यश जाधव
 • दि स्टोरी ऑफ सुपर हिरोज : अजिंक्य कवठेकर
 • राख : निनय जोशी
 • अहमदनगर हून अगतिक : गौरव कुलकर्णी
 • Path Finder : समीर चौधरी
 • सांगली हून किंमत : यशोधन गडकरी
 • लातूर हून नकार देवुया कॅरी बॅग ला वाचवूया गोमातेला : शिरीष कुलकर्णी

या फिल्म्स चा समावेश आहे.

लघुपठ दाखल करण्यासाठी साताऱ्याबरोबर पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, आदी सेंटर्स ठेवण्यात आली होती. परंतू या सेंटर व्यतिरीक्तही विविध जिल्ह्यातून या फेस्टिवलला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट प्रेमी व सामान्य प्रेक्षक यांना हे चित्रपट दि. ३ व ४ नोव्हेंबर २०१२ रोजी शाहुकला मंदिर सातारा येथे पाहण्यास मिळणार आहेत. या फेस्टिवलचे आकर्षण म्हणजे Screening, Live Performance आणि Exhibition..!! सातारकरांनी या फेस्टिवलला उदंड प्रतिसाद प्रतिसाद देण्याचे आव्हान संयोजकांनी केले आहे.