सतीश आळेकर यांचा विशेष सन्मान

सतीश आळेकर

सतीश आळेकर

यंदा सहा मराठी नाटके एनसीपीएच्या ‘प्रतिबिंब’ नाट्यमहोत्स्वात सादर होणार आहेत. ज्येष्ठ नाटक दिग्दर्शक सतीश आळेकर यांचा या महोत्सवात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

३ ऑगस्टला ‘आविष्कार’ निर्मित ‘चित्रगोष्टी’ या नाटकापासून या महोत्सवाचा आरंभ केला जाणार आहे. त्यापुढे ४ ऑगस्टला ‘लख लख चंदेरी’, ५ ऑगस्टला ‘शोकपर्व’ (महाराष्ट्र कल्चरल सेंटर) आणि ‘अपूर्णात अपूर्णम’, ६ ऑगस्टला ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ आणि ७ ऑगस्टला ‘सत्यशोधक’ (पुणे म्युनिसिपल कामगार युनियन) ही नाटके सादर केली जाणार आहेत.