शाहणा गाढव

एक म्हातारा आपला गाढव चारीत होता. इतक्यात त्याचा शत्रू त्या ठिकाणी आला. तेव्हा तो म्हातारा आपल्या गाढवास म्हणतो, ‘गडया, चल आपण पळू जाऊ.’ गाढव म्हणाला, ‘अरे, तुझा तो शत्रू माझ्या पाठीवर कंठळ घालील की नाही ?’ म्हातारा म्हणाला, ‘घालील यांत काय संशय ?’ गाढव म्हणतो, ‘अशी जर गोष्ट आहे, तर मी बेथुन बिलकूल हालणार नाही. माझ्या कपाळची कंठाळ जर सुटत नाही, तर माझा धनी कोणी का होईना !’

तात्पर्य:- आपल्या स्थितीत जर काही पालट होत नसेल, तर कोणाचीही चाकरी करण्यास हरकत नाही. सारखाच त्रास देणाऱ्या दोन धन्यापैकी अमका बरा आणि तमका वाईट, अशी निवड करीत बसण्यापेक्षा नशिबाने जो धनी मिळेल त्याचीच चाकरी करावी, हा उत्तम पक्ष.