साहित्य:
- १ लहान कोबी
- १ कप वाटाणे
- ३ कांदे
- ४ टॉमेटो
- १ तुकडा आले
- १ हिरवी मिरची
- कोथिंबीर
- १/२ लहान चमचा लाल मिरची
- १/२ लहान चमचा हळद
- १/२ लहान गरम मसाला पावडर
- १/२ वाटी खसखस
- १०० ग्राम खवा
- २ चमचे तूप
- २ चमचे काजू
- मीठ चवीनुसार
कृती:

शाही कोबी
कोबी चौकोनी चिरा, वाटाणे शिजवून घ्या. खसखस अर्धा तास पाण्यात भिजवा नंतर आले, हिरवी मिरची व खसखस एकत्र मिक्सरमधुन काढा. कांदा व टॉमेटो वेगवेगळे मिक्सरमधून काढा. काजुचे तुकडे करून तळून घ्या.
एका कढईत तूप गरम करा, त्याच्यात कांदा टाकून लालसर परता. त्याच्यात आले-मिरची-खसखसची पेस्ट टाका. ग्रेव्ही शिजल्यावर त्याच्यात मावा टाका व परता.
आता याच्यात लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला टाका, कोबी व वाटाणे टाका. अर्धी वाटी पाणी टाकून शिजवा. ग्रेव्ही शिजल्यावर गॅस बंद करा. वाढताना काजू व कोथिंबीर वरून टाका व गरम वाढा.