शाही मटर पनीर

साहित्य:

  • २५० ग्रा. वाट्याण्याचे कुटलेले दाणे
  • १०० ग्रा. पनीर, (१/२ इंचाच्या चौकोन आकारात कापावे )
  • २ मोठे टोमॅटो
  • २ मोठे कांदे
  • ५ लसणाच्या पाकळ्या
  • १ इंच आल्याची पेस्ट
  • २ मोठे चमचे मलई
  • १ मोठा चमचा रिफाइन्ड तेल
  • अर्धा चमचा हळद
  • १ चमचा लाल मिरची
  • १ चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ

कृती:

शाही मटर पनीर

शाही मटर पनीर

कढईत तेल गरम करून त्यात किसलेला कांदा व लसणाची पेस्ट टाकावी. कांदा गुलाबी होई पर्यंत भाजावा. नंतर त्यात मलई आणि कापलेले टोमॅटो टाकावे, भाजावे आणि मीठ, तिखट, हळद आणी गरम मसाला टाकावा.

यानंतर दळलेले वाटाणे टाकून भाजावे. नंतर त्यात जायफळ आणि २ छोट्या विलायची वाटुन टाकाव्या. आता यात पनीरचे तुकडे टाकून २ मिनीट भाजावे तसेच एका वाटीत पाणी टाकावे.

उकळी आल्यानंतर त्यास ५ मिनीट कमी उष्णतेवर शिजू द्यावे. शाही मटर पनीर तयार आहे. तयार भाजीवर कापलेली कोथंबीर आणि तिखट टाकून गरमा गरम पराठ्यांबरोबर वाढावी.