
शेजारती
पावला प्रसाद आतां विठो निजावें ॥
आपला तो श्रम कळों येतसे भावें ॥ १ ॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा ॥
पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ २ ॥
तुम्हांसी जागविलें आम्हीं आपुलिया चाडा ॥
शुभाशुभ कर्में दोष हरावया पीडा ॥ ३ ॥
तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन ॥
नाहीं निवडिलें आम्हां आपुलियां भिन्न ॥ ४॥