शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय

अलिकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वंतत्र व्यवसाय झाला आहे. हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहे. शासनही या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे. काही ठराविक जातीच्या शेळ्या दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.

शेळीपालनाचे फायदे :

 1. अल्प गंतवणूकीने हा व्यवसाय केला जाऊ शकतो.
 2. शेळ्या ह्या शेतकर्‍यांसाठी ‘बचत बँकेचे’ कार्य करीत असतात. आवश्यता पडल्यास त्वरित काहीशेळ्या विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
 3. शेतकऱ्यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीच्या दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
 4. शेळ्या काटक असून विपरीत हवामानशी जुळवून घेतात.
 5. शेळ्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
 6. शेळ्याचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
 7. त्यांना जागा कमी लागते यामुळे निवाऱ्या करिता खर्च कमी होतो.
 8. काही जातीच्या शेळ्यापासून लोकर (मोहेर) मिळते.
 9. शेळ्यांचे खत उत्तम असते.
 10. आपल्या देशांत गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
 11. शेळ्यांच्या शिंगा पासून व खुरापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
 12. शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा. लसयसिन, मिथिओनीन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मांसात अधिक असते.
 13. शेळी-पालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केला जावू शकतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत शेळ्यांचे महत्त्व :
जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या असून त्यापैकी १२३ दशलक्ष शेळ्या भारतात आहे. शेळ्यांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे. देशातील दूध, मांस व कातडीच्या एकंदर उत्पदनापैकी ३ टक्के दूध, ४५ ते ५० टक्के मांस व शेळीच्या दुधाला मागणी नाही. खरं तर शेळीचा विकास दूध उत्पादनाकरिता झालाच नाही. आपल्या कडील निवडक जातींच्या शेळ्या एका वेळात २०० ते २५० लिटर दूध देतात. तर विदेशी जातींच्या शेळ्या १२०० ते१७०० लिटर दूध देतात. आपल्या देशात शेळ्यापासून वर्षाकाठी २.२ दशलक्ष टन मांस मिळते. तर पश्चिमात्य जातीच्या शेळीपासून लोकर ही मिळते.

शेळ्यांच्या जाती :
भारतात शेळ्यांच्या प्रमुख २५ जाती आढळतात. आपल्याकडील जमनापारी, बिंटल, सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दूध उत्पादनाकरिता तर बिंटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा ‘मांस’ उत्पादनाकरिता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते. साधारपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. याउलट विदेशी जातींच्या शेळ्या वजनदार असून नराचे सरासरी वजन १०० ते१२५ तर मादीचे वजन ९० ते १०० कि. असते. आपल्याकडे उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या उपलब्ध असून त्या शुद्ध जातीच्या आहेत. बंदिस्त शेळी-पालन करून शेळ्याचे संगोपन केल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. बंदिस्त शेळीपालनात प्रति शेळी १००ग्रॅम खुराक व दिड ते २ किलो हिरवा चारा द्यावा त्यात चिंच, बाभूळ, बोर, पिंपळ, जांभळ, निंब इत्यादी झाडांची पाने समाविष्ट करावीत. २० ते २५ शेळ्यांमागे १ नर असावा गाभण, दूभत्या शेळ्यांना स्वतंत्र जागेत ठेवावे. जंतनाशकांचा वापर करून जंतापासून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

4 thoughts on “शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय

 1. surekha jagtap

  mahilalanchya surakshitet wadh hone garjeche ahe.
  mahilancha
  aadar kela pahije cinematlya heiroinla golya ghatlya pahijet
  anag pardarshan karnarya mahilela kadak shiksha kara.
  mahila shushikshit kara.
  mahilanchy sathi kadak kayda kara.
  karan ajhi bhartamadhye ashi kahi thikane ahetki tyacha ghanerda arth kadhtat.
  people takes it negitively.

 2. Sachin Narayan Kulkarni

  M 1 Nokardar ahe.Mala Nokaritun Paisa kami milato.Mazi jamin pan nahi.pan gharachya mage 2 gunte jamin ahe. mala sheli paln karayche ahe. 2mache prakashan vahale. mahiti khup milalai pan tyache khadya v tyachi niga kashi karachi. ya baddal sanga. v Anudan milate ka? karan mala buisness karayacha ahe. nokari karat.please ha dhunda parvadel ka? m 1lyada kiti shelya ghyayachya sanga. karan m yat navin ahe. please .

Comments are closed.