शेतकरी आणि त्याचा बैल

एका शेतकऱ्याचा एक बैल फार माजला होतो. त्याला नांगराला जुंपल असता तो फार मस्ती करीत असे. एके दिवशी शेतकऱ्याने त्याची शिंगे कापून त्यास नांगरास जुंपले व मनात विचार केला की, आता काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. परंतु बैलाने, हा त्याचा समज लवकरच खोटा ठरविला. त्याने आपल्या खुरांनी इतकी धूळ उडवून दिली की, ती त्या शेतकऱ्याच्या डोळ्यांत जाऊन, त्यास काही एक दिसेनासे झाले.

तात्पर्य:- कोणत्याही कारणाने, प्राणिमात्राच्या ठायी एकदा द्वेषबुद्धी उत्पन्न झाली म्हणजे ती कोणत्या ना कोणात्या मार्गाने आपला प्रताप गाजविल्याशिवाय राहणार नाही.