रायगडावर मर्द मराठा उत्साह

raigad-fort-9

खांद्यावर भगवा झंडा नि डोक्यावर भगवा फेटा अशा थाटात शिवप्रेमी उत्साहाच्या नदीत वाहून गेले होते. तेथील मर्दानी खेळ अंगावर रोमांच उभे करीत होते व शिवगर्जना सह्याद्रीला लाजवत होती. शिवराज्याभिषेक सोहोळ्याने रायगडाला जाग आली होती. रायगडावर मोठ्या उत्साहाने आबालवृद्धांनी ३३९ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पाहिला. छत्र नसलेल्या होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळ्यावर पंचधातूचे छत्र हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत बसविण्यात आले.

राज्याभिषेक दिन गेल्या २० वर्षांपासून तिथीनुसार गडावर साजरा होत आहे. सोहळा पहायला शिवप्रेमी रायगड, ठाणे, मुंबई, भिवंडी, बदलापूर, डोंबिवली, पुणे, शतारा, कोल्हापूर, संगली, रत्नागिरी येथून आले होते. उदयनराजे भोसले, महाडचे आमदार भरत गोगावले, शिव प्रतिष्ठानाचे संभाजी भिडे, राजिप अध्यक्ष कविता गायकवाड, बाळकृष्ण राऊळ, आमदार रुपेश म्हात्रे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.