शिवसेनेचा आज ‘मनमाड बंद’

शिवसेनेचा आज मनमाड बंद

शिवसेनेचा आज मनमाड बंद

अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळयुक्त तेल विकणार्‍यांनी जिवंत जाळल्याच्या (२५ जानेवारी) निषेधार्थ आज (गुरुवारी २७ जानेवारी) शिवसेनेने मनमाड बंदची घोषणा केली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे.

बंदच्या निमित्ताने कोणीही कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारी कृती करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.