श्रीमहालक्ष्मीची आरती ॐ नमो आद्यरूपे

ॐ नमो आद्यरूपे । देवी भगवती माते ॥
काळिका कामरूप । शक्ति तूं जगन्माते ॥
वैष्णवी भूतमाया । मूळपीठ देवते ॥
झालिया भेटी तूझी । नीवारिसी पापंतें ॥ १ ॥
जय श्रीकुलदेवते । महालक्ष्मी ग माते ।
आरती घेउनीयां । ओंवाळीन मी तूतें ॥ ध्रु० ॥
अंबिका भद्रकाली । देवी आद्या कुमारी मारिलें चंडमुंड ।
महिषासुर हे वैरी ॥
हर्षले देवद्विज । गाती जयजयकारी ॥
उजळुनी दीपमाळा । ओंवाळीती नरनारी ॥ जय० ॥ २ ॥
परिधान हेमवर्ण । कंठीं नवरत्नें हार ॥
करतळें रातोत्पळें । अद्भुत जयजयकार ॥
अवतार कोल्हापुरी । केला प्रताप थोर ॥
मारिले दैत्य बिकट । अघट कोल्हासुर ॥ जय० ॥ ३ ॥
नासिकीं मुक्ताफळ । रत्नकुंडलें श्रवणीं ॥
घवघवीत नेपुरें हो । अंदु वाजती चरणीं ॥
मस्तकीं पुष्पहार । दिसे भासे वदनीं ॥
पौर्णिमाचंद्रबिंब । पृष्ठीवरी रुळे वेणी ॥ जय० ॥ ४ ॥
नवकोटी कात्यायनी । चतुःषष्टी योगिनी ॥
भूचरां जलचरां । आई तुजपासुनी ॥
ऐसी तूं महालक्ष्मी जगताची जननी ॥
नामया विष्णुदासा । तुझें चिंतन ध्यानीं ॥ जय० ॥ ५ ॥