सिंधी कढी

साहित्य :

 • १००-१०० ग्रॅम बटाटे
 • गाजर
 • मटारदाणे
 • फ्लॉवर व फरसबी या सर्व भाज्या
 • ४ सुक्या मिरच्या
 • हिरव्या मिरच्या
 • अर्धा चमचा मोहरी
 • पाव चमचा मेथी
 • २ तमालपत्रे
 • अर्धा इंच आले
 • अर्धा चमचा धने
 • पाव चमचा हिंग
 • १ चमचे तूप
 • १ जुडी कोथिंबीर
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचे तिखट
 • ३ चमचे मीठ
 • १ वाटी डाळीचे पीठ
 • ३ वाट्या आंबट दही

कृती :

सिंधी कढी

सिंधी कढी

सर्व भाज्यांचे लहान तुकडे करून वाफवून घ्यावेत किंवा पाण्यात शिजवून घेऊन चाळणीवर निथळावेत. भाज्यांचे पाणी फेकून देऊ नये. ते कढीसाठी वापरावे. आले पिसावे मिरच्यांचे उभे, पातळ तुकडे करावेत. कोथिंबीर निवडून चिरावी. दही घुसळून त्यात डाळीचे पीठ ठेवावे.

कल्हईच्या पातेल्यात तूप गरम करून मोहरी, जिरे, तमालपत्र, मेथी, हिंग, लाल मिरच्या, आले व हिरव्या मिरच्या क्रमाने फोडणीस टाकून परताव्या. त्यावर धने, हळद, तिखट व कोथिंबीर घालावी. घुसळलेले दही घालावे.

उकळी येईपर्यंत सतत ढवळत रहावे. व दाटसर झाले की चार वाट्या पाणी व मीठ घालावे. अधूनमधून ढवळावे. दहा मिनिटे चांगले उकळले की शिजलेल्या भाज्या घालाव्यात. १-२ उकळ्या आल्या की कढी खाली उतरवावी. ही कढी भाताबरोबर किंवा पोळीभाकरीबरोबर छान लागते.