सिंह आणि तीन बैल

तीन बैल मोठे मित्र होते, ते सर्वदा एकाच जागी चरत असत. एक सिंह त्यांस पाहून मनात म्हणे की, ‘यातून एखादा बैल आपणास खावयास मिळेल तर बरे होईल. ’

त्यापैकी एकेकटया बैलास सिंहाने सहज मारिले असते, परंतु ते तिघे एकजुटीने राहत असल्यामुळे त्याजवर उडी घालण्यास त्यास धैर्य होईना. मग त्याने एकमेकांसंबंधाच्या खोटयानाटया चाहडया सांगून त्या बैलांत फूट पाडिली व त्यामुळे ते आपसात एकमेकांचा द्वेष करू लागले. मग ते तिघेही निरनिराळ्या ठिकाणी चरत असता सिंहाने त्या तिघांसही मारून खाल्ले !

तात्पर्य : एकीपुढे शत्रुचे काही चालत नाही. मग तो आपल्या विरूद्धपक्षातील लोकांस नानाप्रकारच्या चाहडया सांगून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करितो. अशा वेळी मनुष्याने फार सावधगिरीने वागले पाहिजे.