सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव

एका गाढवास एक सिंहाचे कातडे सापडले, ते पाघंरून तो फिर लागल्यामुळे, आसपासचे सर्व प्राणी, तो सिंह आहे असे समजून भयाने पळून जाऊ लागले. त्या गाढवाचा धनी जवळच होता, त्याने सिंहाच्या कातडयातून बाहेर आलेले गाढवाचे लांब कान पाहून, हा आपलाच गाढव आहे असे ओळखले व एक लठ्ठ सोटा घेऊन त्याची पाठ अशी मऊ केली की, आपण सिंह नसून गाढवच आहेत, याबद्दल त्या गाढवाची अगदी खात्री होऊन चुकली.

तात्पर्य:- मूर्ख मनुष्याने शहाणपणाचा केवढाही आव घातला, तरी शेवटी त्याची फजिती झाल्याशिवाय रहात नाही.