सोलापूर जिल्हा

आपल्या असामान्य प्रतिमेमुळे शाहिरि जगतात तळपून गेलेले कवीराय रामजोशी यांचा जन्म सोलापूरचाच. पेशवाईच्या अखेरीस दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत होऊन गेलेल्या या शाहिराच्या लावणीने मराठी मनाला कायमच भुरळ पाडली आहे-वेड लावले आहे.

ग्रामीण ढंगाची, शाहिरीबाजाची व रांगड्या श्रुंगाराने नटलेली, तरीही आपली एक नजाकत जपणारी कविरायांची लावणी मराठी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे.

चीनमधील युद्धकाळात १९३८ ते १९४२ च्या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गरिबांची सेवा करून सेवाभावाचा जणू आंतराष्ट्रीय आदर्शच जगापुढे डॉ. द्वारकनाथ कोटणीसही सोलापूरचेच !