सोनकळी

सोनकळी
रखरखीत जीवनात माझ्या,
सावली होऊन तू आलीस.

नऊ मास उदरी राहून माझ्या,
माझी कूस धन्य तू केलीस.

गोजिरवाण्या रूपात तूझ्या,
माझे अख्खे विश्व सामावले.

कोड-कौतुकात मी तुझ्या,
आकंठ मी भिजून मी गेले.

ईवल्याश्या पावलांना तुझ्या,
बोटाने मी सावरत होते.

कळत-नकळतच माझ्या या,
सोनकळीचे फुल झाले होते.

‘कन्या परक्याचे धन’ मानूनी तुला,
बोहोल्यावर तूला चढविले अन.

‘कन्यादाना’ चे पूण्य माझ्या,
ओंजळीत तू घातलेस.

डोळयांत होती स्वप्न तुझ्या अन,
‘हर्ष’ होता तुझ्या मुखी.

सुखी ठेव बा देवराया,
माझ्या ‘सोनकळी हर्षा’ ला,
प्रणाम माझे अनंत कोटी.