दोन दिवसांत अभिनव च्या अहवालावर निर्णय अपेक्षित

अभिनव कला महाविद्यालय

राज्य सरकारच्या चौकशी समितीने अभिनव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मते विचारात घेता त्या बाबतीत तयार केलेला अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. सूत्रांनी माहिती दिली की दोन दिवसांत या अहवालावरील निर्णय अपेक्षित आहे.

शहरातील कलावर्तुळ एकाच प्रश्नाच्या चर्चेने ढासळून गेले आहे-‘अभिनव महाविद्यालय बंद होणार का’. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे पण जोपर्यंत प्रशासक नेमला जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार. हा इशारा आजी-माजी विद्यार्थांसह भारतीय विद्यार्थी सेनेने दिला आहे.

प्रा. जी. जी. वाघमारे, प्रा. दिलीप बोरले व प्रा. अरुण दारोकर यांची चौकशी समिती विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता लक्षात घेता नेमण्यात आली. गेल्या शुक्रवारी महाविद्यालयात येऊन थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून चौकशी समितीने त्यांची मते जाणून घेतली.

विद्यार्थ्यांनी यावेळी महाविद्यालयावर प्रशासक नेमला जाण्याची मागणी करूण समितीसमोर आपले गाऱ्हाणे मांडले. कला संचालक जी. बी. धानोकर यांच्याकडे समितीचा अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे. विद्यार्थी सेनेतर्फे असे सांगण्यात आले आहे की मंत्रालयात हा अहवाल पोचला असून उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दोन दिवसांत त्यावरील निर्णय अपेक्षित आहे.