साहित्य:
- ६ बटाटे
- १ गाजर
- १/४ कप वाटाणे
- १/४ कप घेवडा
- १ कांदा
- १/२ कप दही
- १ चमचा सोया सॉस
- २ कप व्हाईट सॉस
- ३ चीज क्यूब्स
- १/२ लहान चमचा लाल तिखट
- १/२ लहान चमचा काळी मिरी
- मीठ चवीप्रमाणे
- १ चमचा तेल
कृती:

स्टफ पोटॅटो
बटाटे उकडून सोलून घ्या. बटाटे थोडे कमी उकडा. गाजर सोलून लहान लहान तुकडे करा. घेवडा पण बारीक चिरुन घ्या.
गाजर, मटार व घेवडा उकडून घ्या म्हणजे थोडा नरम होईल. बटाटे मधून पोकळ करा. बटाटा आख्खाच राहिला पाहिजे. कांदा, सोलून बारीक चिरून घ्या. कढईत कांदा फोडणीला टाका. थोडा गाजर, वाटाणा व घेवडा टाका. मीठ, लाल तिखट व सोया सॉस टाकून एकत्र करा व परता.
गार झाल्यावर बटाट्यात भरा. व्हाइट सॉसमध्ये दही, मीठ, काळी मिरी पावडर व किसलेली चीज टाका. एक बेकींग डिश घ्या, त्याच्यात बटाटे ठेऊन वरून व्हाईट सॉस टाका व उरलेला चीज टाका.
ओवन आधी १० मिनीटे गरम करा. गरम ओवनमध्ये ४०० डिग्री फे. वर लालसर बेक करा. गरम-गरम वाढा.