सुकी उडीद डाळ

साहित्य:

  • १ कप धुतलेली उडीद डाळ
  • १ कापलेला कांदा
  • १ मोठा चमचा तेल
  • ३/४ चमचे मीठ
  • १/२ चमचे हळद
  • २ मोठी वेलची
  • १ चमचे जीरे
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर
  • २ हिरवी मिरची
  • १ कापलेला टोमॅटो
  • १/२ चमचे गरम मसाला

कृतीः

सुकी उडीद डाळ

सुकी उडीद डाळ

डाळीस धुवुन ४ कप पाण्यात हळद व मीठाबरोबर शिजवून द्यावे आणि गाळून पाणी अलग करावे.

तेल गरम करून जीरे टाकावे नंतर वेलची टाकून १ मिनीट फ्राय करावे.

कांदा टाकुन लालसर फ्राय करावा नंतर डाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व गरम मसाला टाकुन ३-४ मिनीट गॅस कमी करून शिजवावे आणि उतरवून घ्यावे.